Your Cart
Loading

आप्तवाणी श्रेणी - ७

On Sale
$2.00
$2.00
Added to cart

प्रस्तुत ग्रंथ आप्तवाणी-7 मध्ये परम पूज्य दादाश्रीं यांनी जीवन व्यवहारासंबंधी केलेला वार्तालाप आणि प्रश्नोतरी द्वारे निघालेल्या वाणीचे संकलन करण्यात आले आहे. ज्ञानी पुरुष जीवनातील अगदीच सामान्य घटनांनाही असाधारण दृष्टीने व समजने पाहतात. अशा घटना सुज्ञ वाचकांना स्वतःच्या जीवन-व्यवहारात एक नवीनच दृष्टी आणि विचारश्रेणी देणाऱ्या आहेत. वेगवेगळ्या विषयांचे येथे वर्णन केले गेले आहे, त्यातील काही आपल्याला विचलित करतील असेही आहेत. जसे की जंजाळमय जीवनात जागृती, लक्ष्मीचे चिंतवन, गुंतागुंतीतही स्वस्थ राहणे, कंटाळा दूर करणे, चिंतेपासून मुक्ती, भीतीवर विजय मिळवणे, क्लेश-बेचैनी, तक्रार, जीवनाच्या अंतःकाळी काय घडते, क्रोध-कषाय, अति गंभीर आजारात समतेत कशा प्रकारे राहावे, पाप-पुण्य याची व्याख्या, व्यवसायात-ऑफिसात उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्या आणि जीवनात आढळणाऱ्या अशा प्रकारच्या कितीतरी अडचणींतून मार्ग कसा काढावा, इत्यादी. प्रस्तुत ग्रंथात प्रकट ज्ञानी पुरुषाची हृदयस्पर्शी वाणीचे संकलन करण्यात आले आहे, आणि यात काही घटना सविस्तरपणे प्रकाशित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वाचकाला स्वतःच्या जीवन व्यवहारात एक नवनव्या कड्या स्पष्ट होण्यासाठी सहाय्यभूत होतील, असा अंतर आशय आहे.


To know more visit: dadabhagwan website

You will get a PDF (2MB) file