Your Cart

आप्तवाणी-२

On Sale
$2.00
$2.00
Added to cart
मोक्षाचा मार्ग सर्वांसाठी मोकळा आहे. तो मार्ग शोधण्याची गरज आहे. ‘ज्याला सुटायचे आहे त्याला कोणीही बांधू शकत नाही आणि ज्याला बंधनात राहायचे आहे त्याला कोणी सोडवू शकत नाही.’ – परम पूज्य दादाश्री. स्वतः कशामुळे बंधनात आहे? स्वतः अज्ञानामुळे बंधनात आहे आणि ज्ञानामुळे (आत्मज्ञानामुळे) मुक्ती मिळवू शकतो. सर्व बंधनांचे मुख्य कारण अज्ञान आहे. या पुस्तकात परम पूज्य दादाश्रींच्या आध्यात्मिक विचारांची चर्चा वैज्ञानिक दृष्टीने, साध्या व सरळ रित्या केली आहे. त्यांनी या जगाची वास्तविकता, सांसारिक मोह आणि त्याचे परिणाम, धर्माचे प्रकार (रियल आणि रिलेटिव्ह धर्म), तपाचे प्रकार (आंतर आणि बाह्य तप), योगाचे प्रकार  (ज्ञान आणि अज्ञान योग), संयोगांचे प्रकार (स्थूल व सूक्ष्म) तसेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांच्या कार्यांची चर्चा केली आहे. परम पूज्य दादाश्रींचे असे ज्ञान वाचकांचे अज्ञान दूर करून त्यांना मुक्तीच्या मार्गावर पुढील प्रगती करण्यासाठी मदत करेल. हे ज्ञानाचे पुस्तक कोण्या धर्माचे पुस्तक नाही. हे व्यवहारिक आध्यात्म विज्ञानाचे पुस्तक आहे, आणि आध्यात्म इच्छुक (मुमुक्षु), दार्शनिक, विचारक आणि खऱ्याखुऱ्या शोधकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

To know more visit : dadabhagwan website
You will get a PDF (6MB) file