Your Cart

आप्तवाणी-३

On Sale
$2.00
$2.00
Added to cart
जीवनात लोकांची अनेक ध्येये आणि उद्देश असतात. पण  ‘मी कोण आहे?’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकत नाहीत.  आपल्यापैकी अनेकांना ते माहीतच नसते. अनंत काळापासून लोक संसारातील भौतिक साधनांच्या मागे धावत असतात. फक्त ज्ञानी पुरुषच आत्मसाक्षात्कार करवून देऊ शकतात, आणि तुम्हाला संसाराच्या भौतिक बंधनातून मुक्तीही देऊ शकतात. या पुस्तकाच्या पहिल्या भागात परम पूज्य दादाश्रींनी आत्म्याचे गुण आणि अशा अनेक विषयांबद्दल, उदाहरणार्थ ‘स्वतःचे’ (आत्म्याचे) ज्ञान, दर्शन आणि अनेक शक्तींबद्दल सांगितले आहे. सुख, स्वसत्ता, परसत्ता, स्वपरिणाम, परपरिणाम, व्यवहार आत्मा आणि निश्चय आत्मा, अशा अनेक विषयांबद्दलही सांगितले आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात परम पूज्य दादाश्रींनी ‘क्लेशरहित जीवन कसे जगावे’, तसेच योग्य विचारांनी कुटुंबात दु:खी न होता व्यवहार कसा करावा, मुलांशी कसे वागावे याची किल्ली दिली आहे . दुसऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःला सुधारावे, इतरांशी जुळवून घेणे, सांसारिक संबंध कसे निभावावेत, कुटुंब, पाहुणे, आपले वरिष्ठ, अशा वेगवेगळ्या व्यक्तींशी कसे वागावे, नात्यात सहजपणा कसा आणावा, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. या पुस्तकाचा अभ्यास करून  व्यवहारात उपयोग केल्यास जीवन सहज, शांतिमय आणि आनंदमय होईल.

To know more visit : dadabhagwan website
You will get a PDF (2MB) file