आत्मसाक्षात्कार
On Sale
$1.00
$1.00
जीवमात्र काय शोधत असतो? सुख शोधत असतो, परंतु घटक्याभरासाठी सुद्धा सुख मिळत नाही. लग्न कार्यात गेलो किंवा नाटकात गेलो तरी पुन्हा दु:ख हे येतेच. ज्या सुखानंतर दु:ख येत असेल, त्यास सुख म्हणायचेच कसे? ते तर मूर्छेचे सुख म्हटले जाईल, सुख तर परमनन्ट असते. हे तर टेम्पररी सुख आहे, आणि कल्पित आहे, मानलेले सुख आहे. प्रत्येक जीव काय शोधत असतो? कायमचे सुख, शाश्वत सुख शोधत असतो, ते याच्यातून मिळेल, त्याच्यातून मिळेल, हे घेऊ, असे करु, बंगला बांधू तर सुख मिळेल, गाडी घेतली तर सुख मिळेल, असे करतच राहतो. परंतु काहीच मिळत नाही. उलट या जंजाळात अधिक फसला जातो. सुख तर आतच आहे, आत्म्यातच आहे. म्हणून जेव्हा आत्मा प्राप्त होईल तेव्हाच सनातन (सुख) प्राप्त होईल.